टॉप बातम्या

पदवीधरांनी मतदार संघाची नोंदणी करून घ्यावे - मारोती गौरकार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : सन्माननीय पदवीधर बंधु-भगिनींनो,
सविनय नमस्कार.!
आपणांस नम्र विनंती करण्यात येते की, पदवीधरांच्या आपल्या हक्काच्या मतदारसंघाची या वेळी सुद्धा नव्याने नोंदणी करणे शासनाने अनिवार्य केले आहे (जुनी यादी रद्द केली आहे).

भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार संघाची मतदार याद्या तयार करणे व मतदार यांचे आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व पदवीधर मतदारांनी आपले नाव नोंदणी करावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चे मारोती गौरकार यांनी सर्व तालुक्यातील पदवीधरांना केले. 

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ नोंदणी व मतदार आधार क्रमांक जोडण्याबाबत सर्व शहरी ग्रामीण सर्व तालुक्यातील सर्व पदवीधरांनी (बि ए) यावेळी सुरु असलेले मतदार नोंदणी अभियान यात पदवीधरांनी मतदार यादीत आपलं नाव नोंद करून घ्यावी असे मी सर्वाना जाहीर आवाहन करतो आहे.

नव्याने नोंदणी करिता आवश्यक कागद पत्र

1) डिग्री किंवा फायनल इयरची मार्कशिट.
२) आधारकार्ड.
३) पासपोर्ट साईज फोटो.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();