टॉप बातम्या

नात झाली प्रेमात ढीश...अन आजीने घेतले विष

रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा खैरगाव (भेदी ) येथील 21 वर्षीय तरुण व 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील काही वर्षांपासून प्रेमात आकंठ बुडाले. यातच हळुवार रंगीबेरंगी प्रेम बहरत असतांना त्यांनी पळून जाण्याचा बेत आखला आणि त्यावर शिक्कामोर्तबही केला. मागील आठ दिवसांपूर्वी पळून गेलेल्या लव बर्ड्स अल्पवयीन मुलीच्या मामाने मारेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानुसार 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
       
दरम्यान, पळून गेलेल्या नातीच्या आजीने  ती पळून गेल्याचा चांगलाच धसका घेत व मुलांकडील गणगोतांनी दिलेल्या धमकीवजाने चक्क शनिवार च्या रात्रीला विष प्राशन केले.या गंभीर अवस्थेत तिला पांढरकवडा रुग्णालयात दाखल केले व डॉक्टरांनी आजी गिरजाबाई नागो मांजरे (60) हिला मृत घोषित केले.
      
या गंभीर घटनेने नातेवाईकात प्रचंड संतापाची लाट उसळत मृतदेह थेट मारेगाव पोलिसात आणला व मुलीला आणून द्या ..तिच्या साठी आजीने जीवन यात्रा संपवली. ही मागणी करीत नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोरच मृतदेह ठेवत आक्रोश करीत ठिय्या केला.
    
या दरम्यान, काही वेळ तणाव सदृश वातावरण तयार झाल्याने पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल करून तपास गतिमान करण्यावर भर देण्याचे सूतोवाच करण्यावर नातेवाईकांना भर दिला. तक्रार करीत मृतदेह गावाकडे रवाना केलाय.मात्र, काही काळ तणावात असलेल्या पोलीस प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली अन तब्बल तासाभरानंतर हा तणाव आटोक्यात आणत प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. हे विशेष...!
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();