टॉप बातम्या

"युनिक मेडिकल फाउंडेशन" व "आनंदी सेवा केंद्र" यांचा स्तुत्य उपक्रम

अतुल खोपटकर | सह्याद्री चौफेर 

पुणे : समाजसेवा हिच खरी ईश्वरसेवा या विचारसरणीने काम करायचं ध्येय उरात बाळगून डॉक्टर राहुल आणि डॉक्टर सागर या लोखंडे बंधुनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने, सामाजिक बांधिलकी जपत "युनिक मेडिकल फाउंडेशन" पुणे-१६ व "आनंदी सेवा केंद्र" नेरूळ, नवी मुंबई-०६ यांच्या संयुक्त विद्यमाने पाडळी (निनाम), सातारा येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात १६/१०/२०२२ रोजी दिवाळी निमित्त विधवा महिलांसाठी नविन साड्यांचे वाटप, दिवाळी फराळ, तसेच मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या मध्ये ६० महिलांसाठी नऊवारी, सहावारी साड्यांचे तसेच अंगणवाडीतील ३० मुलांना टी शर्ट व बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने सुभेदार श्री मोहन भिकाजी शेलार, श्री राजेंद्र शिवाजी शेलार, मानसी लोखंडे, डॉ. गणेश खाडे, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
अनिल शेलार, राजेंद्र शेलार, धनाजी शेलार व भरतगावचे पोलिस पाटील श्री. प्रताप शेलार यांनी मोलाची मदत केली. सौ रूपाली शेलार, यशोदा वाघ, सिंधू गुरव, स्मिता जाधव, रूक्सार मोमीन, इत्यादी जणांनी शिबिरात सहभाग घेतला.
पाडळी गावातील मनिषा कदम, रेखा ढाणे यांनी युनिक मेडिकल फाउंडेशन च्या सभासदांचा मान सन्मान करीत, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();