विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांचे शिलेदार मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांना आज मातृशोक झाला. अविनाश लांबट यांच्या सांत्वनासाठी आज राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांच्याहस अनेक मान्यवर त्यांच्या घरी दाखल झाले होते.
सौ.मंदाताई देविदासजी लांबट यांच आज पहाटे 5 वाजता दीर्घ आजाराने निधन झालं. मृत्यू समयी 60 त्या वर्ष्याच्या होत्या. आज दुपारी दि.15/10/2022 ला दुपारी 12 वाजता त्यांचे मूळगावी महागाव (सिंधी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. यावेळी शेकडो उपस्थितीतांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.
सौ.मंदाताई यांचे पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सून, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.