टॉप बातम्या

मारेगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वणी पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध


रवी घुमे | सह्याद्री चौफेर 
    
मारेगाव : वणी येथील पत्रकार यांचे घरी चोरट्याने प्रवेश करीत लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढविला.यात गंभीर जखमी झालेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा मारेगाव तालुका प्रेस संपादक , प्रेस सेवा संघाच्या वतीने तीव्र निषेध करीत आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.
    
वणी येथील एका मराठी दैनिकाचे बातमीदार आसिफ शेख यांचे वणी निवासी मध्यरात्री एका चोरट्याने प्रवेश केला.यात बाहेर निघालेल्या आसिफ शेख यांचेवर चोरट्याने मागावून येत रॉड ने हल्ला चढविला. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचेवर वणी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
     
दरम्यान, वणी येथील वाढत्या चोरी, घरफोडीने वणी येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात येत आता जीवघेणा हल्लाही ऐरणीवर आला आहे.
परिणामी झालेल्या हल्ला घटनेचा मारेगाव तालुका प्रेस संपादक , प्रेस सेवा संघ चे वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.हल्लेखोरास तात्काळ अटक करण्यात यावी ही आर्जव मागणी करीत मारेगाव ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्फत पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. 
    
याप्रसंगी तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, सचिव कैलास ठेंगणे, कार्याध्यक्ष दीपक डोहणे, जिल्हा उपाध्यक्ष अनंता गोवर्धन, जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे, तालुका उपाध्यक्ष अमोल कुमरे, सहसचिव सुनील उताणे, संघटक रवी घुमे, पंकज नेहारे, कैलास मेश्राम , कोषाध्यक्ष जयप्रकाश वनकर, सुरज झोटींग, प्रसिद्धी प्रमुख रोहन आदेवार, संतोष बहादूरे, विवेक तोडासे, राजू पिपराडे, सुदर्शन टेकाम, संदीप कोवे आदींची उपस्थिती होती.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();