वणी : मौजा कुर्ली येथील विशाल मारोती गायकवाड (अंदाजे वय 34) हे आपल्या शेतातून कामे करून गावाकडे जात असतांना आज दि.12 बुधवार रोजी अंदाजे सायंकाळी 4. वाजता त्यांचेवर नैसर्गिक विज पडली व त्यातच त्यांचा घटना स्थळी मृत्यू झाला. मयत व्यक्तीच्या नावे चिखली येथे शेती असून मृतकाच्या पाठीमागे वडील, आई, पत्नी, व दोन मुली आहेत.