विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
या उदघाटन प्रसंगी ग्राम.सदस्य अंकुश माफुर उपस्थित होते तसेच श्री. मारोती पाटील गौरकार, ग्रामसंघ अध्यक्ष मीना ताई खडसे, सचिव सुनंदाताई टेकाम, श्री आकाश कुमरे, कुमार अमोल कुमरे यांच्या उपस्थितीत ग्रामसंघ फलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी अंकुश माफूर यांनी ग्रामसंघाला शुभेच्छा दिल्या व सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोनोन्नती अभियान अंतर्गत उज्वला महिला ग्रामसंघ, प्रभाग कृषी व्यवस्थापक श्री. महेश पाचपोहर, प्रभाग पशु व्यवस्थापक श्री. प्रफुल शंभरकर व समुदाय संसाधन सखी सारिका कुमरे, यांचे सहकार्य लाभले असून भालेवाडी ग्रामसंघ समूहातील असंख्य महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.