टॉप बातम्या

नांदेपेरा परीसरातील जनतेचा लढा यशश्वी; अखेर जड वाहतुक बंद!


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : दि.10 ऑक्टोंबर पासून नांदेपेरा परीसरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे यांचे नेत्रुत्वात 'जड वाहतुक बंद करण्यात यावी' या मागणीला घेऊन जनतेचा प्रखर रास्ता रोको आंदोलन सुरू होते.हे आंदोलन दि.12 ऑक्टोंबर पर्यंत सुरू होते.आंदोलनाची धग पाहता आमदार बोदकूरवार यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करवुन लगेच जड वाहतुक बंद करून पर्यायी मार्गावर ही वाहतूक वळविण्याचा आदेश काढला.हा आदेश आमदार साहेबांनी आंदोलकांची भेट घेऊन आदेशाची प्रत दिली.या आदेशावर 12 ऑक्टोंबर.पासुन अमलबजावणी सुरू केली आणि आंदोलनाची सांगता केली.आंदोलनात वाहतुकीसह रोड दुरुस्ती,शेतकरयांना विम्याची 21टक्के अग्रीम बोनस, मार्डी ते नांदेपेरा या नविन रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चौकशी करणे आदी मागण्याही करण्यात आल्या.
       (जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सा. बां. विभागाचे आदेशाचे फलक झळकले)

आंदोलनात भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे, तालुका सचिव काॅ.राकेश खामनकर, शंकर केमेकार, अनिल देऊळकर (सरपंच मजरा), गणेश रांगणकर, एकनाथ रायसिडाम, दिलीप पेचे, भारत केमेकार, सारंग घाटे, अथर्व निवडींग, प्रदीप केमेकार,अविनाश केमेकार, प्रफुल केमेकार, अजय भोसले, प्रणीत पाटील, प्रविण चिकटे, दादाजी डोंगे, संतोष उपरवट, राजु डोंगे, शुभम खोंडे, चंपत ठेंगणे, अमोल चहानकर, विठ्ठल गोबाडे, अधिकराव चहानकर, योगेश डोंगे, अमोल भोकरे, संजय चहानकर, राजु चिडे यांचेसह परीसरातील सर्व गावांचे शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();