टॉप बातम्या

जड वाहतुकीच्या विरोधातील लढ्याला आले यश.- प्रशांत भंडारी.

रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगांव :  तालुक्यातील मार्डी सर्कल चे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत भंडारी व त्यांचे सहकारी मोहन देवाळकर,गौरव आसेकार,सुधाकर धांडे,नितेश घोरुडे व रोशन शिंदे यांनी जी कोळशाची जड वाहतूक, एकोना खदान मार्डी, मच्छिंद्रा, वनोजादेवी,मजरा,वांजरी मार्गे वणी ला होत होती.या जड वाहतुकीला आळा घालण्यासाठी यांनी जोरदार लढा दिला,त्या करिता नांदेपेरा येथे ता.10/10/22 ला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये वणी तालुक्यातील समाजसेवक कॉ.अनिल घाटे,अनिल देऊळकर, पेचे,चिकटे,राकेश खामनकर,केमेकर इत्यादी सगळ्यांनी मिळून कायदा व सुव्यवस्थेला बाधा ना पोहोचवता गांधी मार्गाने सामुहिक आंदोलन केले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी रास्तारोको आंदोलनास भेट देऊन त्याच स्थळावरून जिल्हाधिकारी साहेबांना भ्रमणध्वनी द्वारे या मार्गाची झालेली क्षती निदर्शनास आणून दिली.व वाहतूक वळतीचे तात्काळ आदेश काढा अन्यथा मी स्वतःही आंदोलनात सहभाग होईल असा ईशाराही दिला. याची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी वाहतूक वळती करण्याचे आदेश पारित केला. आमदार साहेबांनी याची प्रत आंदोलन कर्त्यांना नांदेपेरा येथे आणून देऊन आंदोलन यशस्वी केले.
(निकृष्ट कामाचे चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देताना प्रशांत भंडारी व इतर मान्यवर)

त्या बद्दल आंदोलन कर्त्यांनी आमदारांचा सत्कार घेतला.सत्कार समारंभात सामजिक कार्यकर्ता प्रशांत भंडारी यांनी पूरग्रस्तांना अतिृष्टी व्यतिरिक्त तत्काळ मदत, पीकविमा कंपनीकडून तत्काळ मदत मिळवून देण्याचीही विनंती केली. काही महिन्यापूर्वीच बनलेल्या राज्य महामार्गला मोठमोठे खड्डे पडलेले या खड्ड्या मुळे जीवितहानी होण्याची डाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मार्डी ते नांदेपेरा मार्गास नव्याने पडलेले मोठमोठे जीवघेणे खड्डे निदर्शनास आणून देत त्यात निकृष्ट दर्जाचे झालेले बांधकामाची चौकशी करून कारवाही करावी असे निवेदन आमदार साहेबांना देण्यात आले. 
यावेळी प्रशांत भंडारी यांनी सर्व यशस्वी सहभागी आंदोलन कर्त्यांचे आभार मानले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();