उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अति पावसामुळे व नदी नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्याच्या वतीने सरकारला करण्यात आली होती. या मागणीचे भाजपा व बाळासाहेबांचे शिवसेना सरकारने दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दोन हेक्टर ची तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढून व आर्थिक मदत 10000 हजारावरून 13000 प्रती हेक्टर याप्रमाणे भरीव वाढ करून एन दिवाळीच्या सणासुदीच्या पर्वावर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांमधील एक प्रकारे आनंदाचे वातावरण आले असून शेतकऱ्यांच्या वतीने मा. ना. श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत, सत्कार करण्यात आले. तसेच मा. ना. श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत दिवाळीच्या सणासुधाची कसल्याही प्रकारची आर्थिक मदत झाली नाही परंतु एक फॅक्टरीत काम करणारा मजूरदार यांना दिवाळीचे बोनस रूपात त्या कामगारांना मदत मिळत असते.
शेतकऱ्याला दिवाळी सण दुसऱ्याकडून उसनेवारी करून साजरा करावा लागतो दरवर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड ,आनंदी झाली पाहिजे यासाठी सरकारने शेतकऱ्याची कसलीही नुकसान न बघता दरवर्षी दिवाळीचे बोनस रुपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यात यावी अशा प्रकारचे श्री अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांचे तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले .यावेळी श्री.प्रमोद जाधव श्री.घनश्याम डोंगरे.श्री.वसंता महाले.श्री. नथुजी बोंद्रे इत्यादी शेतकरी वर्ग उपस्थित होते.