सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारला महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गंगाधर उगे यांच्या विशेष मार्गदर्शनात मारेगाव तालुका पोलीस पाटील श्रमिक संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. मारेगाव येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील पोलिस पाटलांनी भारत येडमे यांची तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.
तालुका सचिव म्हणून भास्करराव पिंपळकर तर, उपाध्यक्षपदी देवानंद वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.
तालुक्यातील बहुतांश पोलीस पाटील यांचा सभासदात समावेश करण्यात आला.नवनियुक्त कार्यकारीणीतील पदाधिकारी यांचा संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण निमसटकर, सूत्रसंचालन अमोल कुडमेथे तर रामलाल राठोड यांनी आभार मानले.