घरकुलाच्या स्वप्नाला महागाईची झळ,बांधकाम साहित्य महागल्याने अनुदानात वाढ करण्याची गरज


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : तालुक्यातील. गोरगरीब व्यक्ती पोटाची खळगी भरून घराचे बांधकाम करू शकत नाही. अशा व्यक्तींना शासन घरकुल योजनेअंतर्गत निधी दिला जातो, पण गत काही दिवसात बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. या अल्पनिधीतून आता घर बांधणे शक्य नाही. परिणामी, गोरगरिबांच्या स्वप्नावर विरजण पडले आहे. अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे. व्यक्तीला आपला हक्काचा निवारा असावा असे वाटते. यासाठी तो आयुष्यभर काबाडकष्ट करतो. मात्र अनेक जणांचे उत्पन्न फारच थोडके असते. यातून ते घराचे स्वप्न पाहू शकत नाही. अशा गोरगरीब नागरिकांना शासन घरकुल बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देते. प्रत्येक गावात लोकांची नावे घरकुल यादी मध्ये समाविष्ट झाली आहे. येणाऱ्या काही दिवसात शासनाचा निधी देखील येईल. मात्र महागाई गगनाला भिडली आहे. परिणामी गोरगरिबांचे घराचे स्वप्न आता स्वप्नच राहणार आहे.

सध्या बांधकामात व्यवसाय तेजीत आहे. त्यातच बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पुन्हा भाव वाढण्याची शक्यता दुकानदाराकडून वर्तविली जात आहे. लोखंड प्रतिक्विंटल मागे भाव वाढले आहे.

वाळू गीटी चे भाव गगनाला भिडले आहेत. त्याच प्रमाणे मजुरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून शासनाकडून मिळणारा अनुदानात तेज होणे शक्य नाही. तर येणाऱ्या काळात महागाई अजून वाढेल यात शंका नाही. असे असताना गरिबाचे घराचे स्वप्न कसे पूर्ण होणार असा प्रश्न ? लाभार्थ्यांना भेडसावत आहे. शासनाने अनुदानात वाढ करावी अशी गोरगरीब लाभार्थ्यांची मागणी आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();