टॉप बातम्या

साहेबांनी आदेश तर काढले; मात्र आज सुद्धा नांदेपेरा रोडवर आंदोलन..!

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : आज सोमवारी अवैध जड वाहतुक विरोधात नांदेपेरा येथे आंदोलन केले, यात मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली होती. अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मुजोर ट्रक मालक नियम मोडत वाहतूक करित असल्यामुळे या होणाऱ्या व जीवघेण्या अवैध जड वाहतूकी विरोधात कॉ अनिल घाटे व सहकारी यांच्या नेतृत्वात आज दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता वाहन अडवून आंदोलन करण्यात आले. यांचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले असल्याने मा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नांदेपेरा वणी मार्गांवरील वाहतूक बंद करण्याचे आदेश काढले आहे. परंतु दि. 12 ऑक्टोबर पासून अंमलबजावणी असल्यामुळे आंदोलन कर्ते मंगळवारी सुद्धा आंदोलन करणार आहे असे कॉ घाटे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आज तर झाले परंतु उद्याही आंदोलन सुरु राहील, आणि जो पर्यंत जड वाहतूक कायमची बंद होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहील असे एकंदरीत वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

जड वाहतूक संदर्भात साहेबांनी आदेश तर काढले मात्र, दोन दिवसांनंतर म्हणजे दि. 12 ऑक्टोबर 2022 पासून ते पुढील आदेशापर्यंत वणी ते नांदेपेरा रोड वरील होणारी जड वाहतूक बंद करून खैरी-वडकी-करंजी-मारेगाव- वणी या मार्गाने वाहतुकीस योग्य असल्याने या रोडनी वळविण्यात यावी दि 10-10-2022 रोजी असा आदेश दिला आहे. आदेशाचे उलंघन केल्याचे निदर्शनास आल्यास ममुका 1951 चे कलम 131 अन्वये उचित कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद केलं आहे. त्यामुळे आज रोजी मात्र, जनतेच्या आंदोलनास यश आले असून सायंकाळी जड वाहतूक मार्डी मार्गे पिसगाव वरून भरमसाठ ट्रक मारेगावच्या दिशेने फिरकली.
(कॉ अनिल घाटे व मान्यवर आमदार बोदकूरवार यांच्याशी चर्चा करताना)

परिणामी वणी-नांदेपेरा या मार्गांवरील जीवघेणी अवैध जड वाहतूक बंद होते की नाही? गावाकऱ्यांच्या आंदोलनाला यश  मिळेल का? अधिकाऱ्यांच्या आदेशाला परत केराची टोपली दाखवली जातील की काय? दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांना सुटका मिळतील का? कारवाई चा बडगा मुजोर ट्रक चालकांवर उगारला जाईल का..! याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();