सह्याद्री चौफेर | न्यूज
या शिबीराच्या अध्यक्षस्थानी मारेगांव न्यायालयाचे न्यायाधीश निलेशजी वासाडे होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध डॉ. अतुल गौरकार, डॉ. अश्विनी झाडे व अॅड. परवेज पठाण होते तर प्रमुख उपस्थिती अॅड. फटाले व अॅड. चैताली खंडरे विचार पिठावर होते. डॉ. अतुल गौरकार यांनी मानसिक आजार होण्याची प्रमुख कारणे विषद केली तर, अॅड. परवेज पठाण यांनी कायद्याच्या दृष्टीने मानसिक आजारातून होत असलेले गुन्हे व त्यातून समाजाची कशी हाणी होते त्यातून वाचण्यासाठी मार्गदर्शक तत्वे कायद्याच्या माध्यमातून उपस्थिता समोर आपल्या मार्गदर्शनातून मांडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधिश निलेश वासाडे यांनी मार्गदर्शन शिबीरातून गुन्हेगारी कमी करण्यास मदत होते त्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे असे सूतोवाच केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.मेहमुद खान पठाण यांनी केले तर आभार अॅड. मृणाली गाणार यांनी मानले, कार्यकम यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.