टॉप बातम्या

सूरमाज फाउंडेशनच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चोपडा : प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वा सल्लम यांच्या जन्मदिनाला ईद मिलाद म्हणतात त्यांनी आपल्याला असंख्य चांगल्या गोष्टी आणि जीवन जगण्याचे मार्ग शिकवले आहेत ज्याचे पालन प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने केले पाहिजे, म्हणून सूरमाज फाउंडेशनने 9 ऑक्टोबर 2022 रोजी चोपडा शहरात 100 मुस्लिम, हिंदू आणि आदिवासींचे कुटुंबात खाद्यपदार्थ (तेल, मैदा, डाळी, साखर, चहा, कॉफी, तांदूळ) वाटप केले, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे कारण सूरमाज फाऊंडेशन ठरले, त्या मुळे सर्वांनी सूरमाज फाऊंडेशनचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाज फाऊंडेशन), जियाउद्दीन काझी साहब, अबुलैस शेख, डॉ. एम.डी. रगीब, शोएब शेख, कदीर मलिक, जुबेर बाग, डॉ. मोहम्मद जुबेर शेख आणि सूरमाज फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांनी हातभार लावला.

 सूरमाज फाऊंडेशनप्रमाणे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने गरजूंची गरज पूर्ण करून ईद ए मिलादुन्नबी साजरी करावी, अशी आमची अपेक्षा आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();