टॉप बातम्या

वंचित बहुजन आघाडीचे असंख्य शिलेदार यवतमाळ येथे रवाना

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे असंख्य शिलेदार यवतमाळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी आज दि. १४ शुक्रवार रोज सकाळी ९ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित येऊन यवतमाळ येथे रवाना झाले आहे. पक्ष प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेणार आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न होणार असून या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने कोणत्या भूमिकेत कार्य करायचे व आपले उमेदवार कसे निवडून पाठवायचे या करिता कार्यकर्ता कसा असावा व तो कोणत्या पद्धतीने कार्य करणारा असावा या करिता आज प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मेडिकल चौक येथील सेलिब्रेशन हॉल मध्ये संपन्न होणार असून यावेळी सिद्धार्थ भोजने, शरद वसतकर, लक्ष्मन पाटील, मोहन राठोड, लक्ष्मीकांत लोळगे, धनंजय गायकवाड, धम्मवती वासनिक, कुंदन नगराळे, करुणा चौधरी आदी मान्यवर उपस्थित असणार आहे.

या मेळाव्याकरिता वणीतून जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, शहराध्यक्ष किशोर मुन, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना नगराळे, डॉ. आनंद वेले,ओमेश परेकर,निशिकांत पाटील, बाळू निखाडे, रामदास पखाले, वैशाली गायकवाड, अर्चना कांबळे, विठ्ठल सातपुते, मनोज डोंगरे, ताई डोंगरे, कुणाल मोडक, पुरुषोत्तम दुधगवळी, सुषमा दूधगवळी, कीर्ती लभाने, शारदा मेश्राम, नंदनी ठमके, अर्चना दुर्गे, अंजु पासवान, सुनीता दुपारे, बुद्धिजम तेलंग, बुधघोष लोणारे, नंदा कावडे, बरखा मुन, यांच्यासह असंख कार्यकर्ते रवाना झाले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();