टॉप बातम्या

नरसाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : नरसाळा येथे आज दि.13 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाअंतर्गत व मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना देठे यांच्या मार्गदर्शनात नरसाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात गावातील महिला पुरुष एकूण 302 लोकांची तपासणी करून त्यांना औषधी व गोळ्याचे वाटप करण्यात आले.या शिबिराला येथील सरपंच संगीत मरसकोल्हे, उपसरपंच यादवराव पांडे,पेसा कोष समितीच्या अध्यक्षा उज्वला मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोडापे सर, डॉ.शिंदे, समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्विनी ए.चंदनखेडे,आरोग्य सेवक सुधाकर कोलूरी,आशा वर्कर मीना राऊत,आरोग्य मदतनीस गीता कुळमेथे या सर्वांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सकार्य केलेत.
       (तपासणी शिबिराला प्रतिसाद देताना गावकरी)
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();