चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील पाथ्रड देवी येथील आज दि.16 आॅक्टोंबर 2022 रोजी पाथ्रड देवी येथील गोकी नदीच्या दक्षिनेकडे दोन किलोमिटर अंतरावर अंदाजे 3:00 ते 3:30 ला मेंढपाळ आपल्या कळपासह नदीवर मेंढ्यांना पाणी पिण्याकरिता नदीपाञात उतरत असतांना अचानकपणे रानडुकरांच्या कळपाने हल्ला केल्यामुळे अचानक झालेल्या हल्याने मेंढ्या नदी पाञातील इसोरावर अडकल्यामुळे नदीच्या पान्याच्या प्रवाहात वाहत असतांना एकमेकांवर आदळुन 26 मेंढ्या जागींच गतप्राण झाल्या तर एक मेंढी वाहुन गेली, सदर मेंढपाळ हा ब्रम्ही येथे राहत असल्याचे समजते, घटनास्थळी गावचे तलाठी, कोतवाल यांनी पंचनामा केला,
अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले त्यात आहे. त्या मेंढपाळ व्यक्ती ची परीस्थिती हालाखीची असल्याने शासनाच्या मदतीची गरज असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेमुळे पाथ्रड देवी येथिल नागरिकांमधे हळहळ व्यक्त होत आहे.