टॉप बातम्या

सूरमाज फाउंडेशनचा दिवाळी 2022 सण

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चोपडा : दिवाळी हा आपल्या हिंदू बांधवांचा एक महत्वाचा सण आहे जो संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.या सणात प्रत्येकजण आपापल्या घरांना दिवे लावतात आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह आनंद साजरा करतात.

हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा प्रतीक आहे, परंतु आपल्या देशातील काही गरीब कुटुंबे हा सण बनवण्यापासून आणि आनंदात सहभागी होण्यापासून वंचित असतात. हे लक्षात घेऊन 22 आणि 23 ऑक्टोबर 2022 रोजी चोपडा शहराचे सुरमाज फाउंडेशनने अशा गरीब कुटुंबांचा शहरात शोध घेऊन त्यांना दिवाळीच्या आनंदात सामील होण्यासाठी दिवाळी ची 100 किट दिला जेणेकरून ते लोकही आनंदी होतील. एकमेकांच्या सुखात सहभागी होऊन बंधुभावाने जगावे, अशा पद्धतीने काम करून सूरमाज फाऊंडेशनने आदर्श घालून दिला आहे.

हा उपक्रम राबवण्यासाठी हाजी उस्मान शेख (अध्यक्ष, सूरमाज फाऊंडेशन) जियाउद्दीन काझी साहब, आरिफ काँट्रॅक्टर साहेब, आरिफ भाई, सामाजिक कार्यकर्ता, अबुलैस शेख, प्रकाश पुरुषोत्तम काविरे, जुबेर बैग, अब्दुल कादिर, डॉ. एम.डी. रगीब, डॉ. मोहम्मद जुबेर शेख व सूरमाज परिवाराचे मोलाचे योगदान होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();