सप्त खंजिरी वादक श्री सत्यपाल महाराज यांचे समाज प्रबोधन कार्यक्रमातून दारू व्यसनमुक्तीच्या संदेश


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
        
चंद्रपूर : दीपावलीच्या शुभ पर्वावर प.पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना तालुका चंद्रपूर आयोजित श्री.अनिल डोंगरे यांचे माध्यमातून सप्त खंजेरी वादक श्री सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधन पर किर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष.देवरावदाद भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा प्रमुख अतिथी श्री नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा श्री ब्रिजभूषण पाजारे जिल्हा शहर महामंत्री भाजपा.श्री.भूषण भराते जिल्हा कृषी अधिकारी डॉ.सुशील मुंदडा श्री.अमित गुंडावार श्री राहुल पावडे श्री.महेश कोंडावार ठाणेदार पडोली श्री.लक्ष्मीकांत धानोरकर श्री दिगंबर वासेकर श्री.अविनाश राऊत श्री.भालचंद्र रोहनकर श्री पं काळे श्री.धनराज मुरकुटे.श्री. विकी लाडसे श्री.नरेंद्र जीवतोड.यांची प्रामुख्याने उपस्थित होती.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमपूज्य शेषराव महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या फोटोला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. श्री सत्यपाल महाराज यांनी दारू व्यसनमुक्तीचा संदेश देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच समाजात इतर वाईट प्रवृत्तीवर प्रबोधन पर कीर्तन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दारूची नशा न करता तेच पैसे वाचवून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करा आपल्या मुलाबाळाकडे अंतर मनाने बघा दारूची नशा आपोआप सुटेल आपण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करून व्यसनमुक्त समाज घडवण्याचा प्रयत्न केला आता समाज प्रबोधन कार्यक्रम घेऊन दारू व्यसन मुक्त समाज घडवीन्याचा प्रयत्न करणार हा सुंदर असा कार्यक्रम श्री.अनिल डोंगरे व त्यांचे टीमने घेतला मी मनापासून अंतकरणापासून त्यांचे कौतुक अभिनंदन करतो असे ते मार्गदर्शन पर बोलले. या कार्यक्रमांतर्गत श्री.अनिल डोंगरे यांच्या कितेक वर्षापासून चाललेल्या समाजसेवा कार्याबद्दल स्वामी विवेकानंद ज्ञान प्रसारक मंडळ पडोली व संत गाडगे महाराज पुरुष बचत गट यशवंत नगर यांचे वतीने श्री.अनिल डोंगरे यांचा मा.ना.श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार व श्री. सत्यपाल महाराज यांचे हस्ते शाल श्रीफळ,शिल्ड, पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमात आजूबाजूचे गाव शेजारी तसेच चंद्रपूर शहराचे हजारोंच्या संख्येने पुरुष,महिला वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल गावंडे गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री आकाश क्षीरसागर, श्री बाबुराव मुगोले, श्री श्रीकृष्ण पिंपळकर, श्री देविदास कौरासे, श्री उत्तम लडके, श्री सूर्यकांत डवरे, श्री पंकज ठाकरे, इत्यादीने विशेष परिश्रम घेतले.