"आनंदाचा शिधा" किट ऑफलाईन वाटप, सर्व राशन दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने शिधावाटप व किटचे वाटप करण्याचे आदेश - तहसीलदार संजय जाधव


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : तालुक्यातील सर्व राशन धान्य दुकानांना दिवाळीचा सण हा रंक - रावांसाठी आनंदाचा सण असतो . सणाकरिता प्रत्येकच घरात आनंदाचे वातावरण असते . या आनंदी वातावरणाला द्विगुणीत करण्याकरिता शिंदे - फडणवीस सरकारने आनंदाचे कीट या संकल्पनेतून शिधा वाटप करण्याचे ठरविले होते परंतु रास्त दुकानदारांच्या दुकानावर फिरलो असता तेथे गोंधळ उडायचे दिसून आले. या पॉस मशीन बंद पडणे ' लोकांना रास्त दुकानात त्रास होणे .

रास्त दुकानदारांना सुद्धा या वाटपात खूप त्रास होत असल्यामुळे त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली. यासंदर्भात माननीय तहसीलदार संजय जाधव व पुरवठा अधिकारी शिरीष कापडे यांना फोन केला असता त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेतली आणि सर्व रास्त दुकानदारांना बोलावून ऑफलाइन पद्धतीने आनंदाच्या किडचे वाटप करावे असे आदेश दिले . यामुळे समस्त लाभार्थ्यांनी सुद्धा मा. तहसीलदार यांचे व रास्त दुकानदारांचे तथा शासनाचे मनोमन आभार मानले.
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !