सह्याद्री चौफेर | न्यूज
चोपडा : आपल्या कामामुळे नेहमीच चर्चेत असणार्या सूरमाज फाऊंडेशनने यावेळी गरीबी आणि परिस्थितीमुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या व अभ्यासापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच, डाइजेश व कंपास पेटी देण्याचा निर्णय घेतला.
हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाज फाऊंडेशन) यांच्या हस्ते या कामाची सुरुवात झाली, त्यामुळे चोपडा शहरातील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह चे अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तक डायजेस्ट व कंपास पेटी मिळण्याचा लाभ घेतला आहे.
श्री. महेश पी. शिरसाठ (पत्रकार) आणि जियाउद्दीन काझी (सामाजिक कार्यकर्ते) हे कार्य पूर्ण करण्यासाठी योगदान दिला.
आपणा सर्वांना विनंती आहे की जे विद्यार्थी 10वी चे शिक्षण घेऊ इच्छित आहेत त्यांनी हाजी उस्मान शेख, डॉ. मोहम्मद रगीब, अबुलस शेख, मुजाहिद ए इस्लाम शेख, डॉ. मोहम्मद जुबेर शेख आणि सूरमाज फाउंडेशन यांनीच प्राथमिक औपचारिकता पूर्ण करून बुक सेट साध्य करू शकतो.