सह्याद्री चौफेर | न्यूज
चंद्रपूर : माननीय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे दारू व्यसन मुक्ती या कार्यावर नेहमी तत्पर असून चंद्रपूर जिल्ह्यात दारू व्यसनमुक्त समाज घडविण्याकरिता परमपूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूरच्या माध्यमातून मा. नामदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार हे नेहमी या कार्यास कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवू दारू व्यसनमुक्ती वर आपले मोलाचे मार्गदर्शन देऊन दारू व्यसन मुक्त समाज घडवण्यात त्यांच्या मोलाचा वाटा आहे. मा. नामदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदावर नियुक्ती झाल्याबद्दल प.पुज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे अतिशय आनंदी,उत्साही झाले असून मा. ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा विचोडा (बु) येथील एका कार्यक्रमात शाल, मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.अनिल डोंगरे, श्री.लक्ष्मीकांत धानोरकर जिल्हा उपाध्यक्ष श्री.पंडित काळे, जिल्हा कोषाध्यक्ष.श्री. दिंगाबर वासेकर, जिल्हा संघटक श्री.आकाश श्रिसागर, श्री. श्रीकृष्ण पिंपळकर, श्री.पवन आसुटकर, श्री. पोटे इत्यादी उपस्थित होते.