टॉप बातम्या

आवळगाव येथील बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात गळफास, विनयभंग, विषप्राशन मालिका कायम असतांना आता बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ होत असतांना दिसत आहे. तालुक्यातील मौजा आवळगांव येथील 24 वर्षीय युवक दोन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या युवकाचा आज दि. 12 जुलै रोजी सकाळी आठ वाजता च्या दरम्यान, सार्वजनिक विहीरीत मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गणेश अरविंद काळे रा. आवळगांव असे विहिरीत आढळलेल्या मृत युवकाचे नाव आहे. येथील पोलीस पाटील  टेकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा दोन दिवसांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाला होता. मृतदेह विरीहीत आढळून येण्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. 
दरम्यान, आज मंगळवार सकाळी गावातीलच विहिरीतत्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीस पाटीलांनी मारेगाव पोलिस स्टेशन ला माहिती दिली. गणेशच्या पाठीमागे आई व एक बहिण असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();