टॉप बातम्या

आज होणारे रक्तदान शिबीर येत्या 15 ऑगस्ट ला

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साई मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आज दि. 12 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

परंतु मागील चार दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने आज होणारे रक्तदान शिबीर हे पुढे ढकलण्यात आले आहे.

दरवर्षी वेळेवर होणारा आयोजित कार्यक्रम यावेळी सध्या खूप मोठ्या प्रमाणात पाऊसाचे वातावरण असल्यामुळे आज चा कार्यक्रम हा येत्या  15 ऑगस्ट 2022 ला होणार आहे. मात्र उद्या शोभा यात्रा व महाप्रसाद ठरल्या प्रमाणे असल्याचे साई मित्र परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();