कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वंश निलेश पचारे असे खेळता खेळता डोक्याला मार लागून पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
त्याचेवर चंद्रपुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना त्याने आज सोमवारला अखेरचा श्वास घेतला.
मृतक बालक नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होता. शनिवारी वर्गातीलच विद्यार्थ्यांसोबत खेळतांना एका विद्यार्थ्याने याला उचलण्याचा प्रयत्न केला असता, तो डोक्याच्या भारावर पडला. त्यात त्याच्या डोक्याला मुका मार लागल्याने तो काही वेळ जागेवरच पडून राहिला.
नंतर त्याला शुध्द आल्याने शिक्षकांनी त्याला पायदळ घरी पाठविले. घरी पोहचताच बालक चक्कर येऊन पडला. आई वडिलांनी त्याला तत्काळ वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण तेथील डॉक्टारांनी त्याला चंद्रपुरला हलविण्यास सल्ला दिला. चंद्रपुर येथे उपचार सुरु असतांना त्याने अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती प्राप्त झाली आहे.
चिमुकल्याच्या परिवाराने शाळेला दोषी ठरवत आक्रमक भूमिका घेतल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून आमदार, नप मुख्याधिकारी, तहसीलदार व युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांनी कुटुंबियांची भेट घेवून प्रकरण जाणून घेतले.