टॉप बातम्या

निस्कीन मॉन्क्स कुंग-फू क्लब; वणी तर्फे बेल्ट ग्रेडेशन कार्यक्रम संपन्न

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : येथील निस्कीन मॉन्क्स कुंग-फू क्लब च्या वतीने बेल्ट ग्रेडेशन कार्यक्रम दि. 10 जुलै रोजी वाघोबा खंडोबा देवस्थान हॉल येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी वणी नप चे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून नरेश मोडक उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी व मुख्यमार्गदर्शक म्हणून शरद चिकाटे हे उपस्थित होते.
संस्थेचे सचिव राजू घुमे, माजी मुख्याध्यापक जेणेकर सर, गिन्नलवार काकाजी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी क्लब मधील सहभागी विद्यार्थ्यांनी सेनसाई सिद्धार्थ सोनारकर सर, व सचिन डाके सर यांच्या मार्गदर्शनात पाहुण्यासमोर मार्शल आर्ट व कराटे चे प्रत्यशिक सादर केले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना श्रेणीनुसार बेल्ट प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज उमरे सर यांनी व आभार प्रदर्शन सुरेंद्र बुच्चे सर यांनी केले.
या कार्यक्रमाकरिता सर्व विद्यार्थ्यांचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();