टॉप बातम्या

ग्रामपंचायत दहेली येथे घाणीचे साम्राज्य


चेतन पवार | सह्याद्री चौफेर

दारव्हा : तालुक्यातील दहेली गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बऱ्याच ठिकाणी नाल्या तुंबल्याने परिसरातील रस्त्यांवरून दुर्गंधीयुक्त घाण पाणी ओसंडून वाहत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात स्वच्छ भारत अभियान राबवले जाते. मात्र, या अभियानात अस्वच्छ गाव बनले आहे.

दहेली ग्रामपंचायतीकडुन स्वच्छतेसाठी जवळपास वर्षाला लाखो रूपये स्वच्छतेवर खर्च केले जातात इतके पैसे खर्च करूनही गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे लाखो रुपये कोणाच्या खिशात जातात, हा सवाल नागरिकांच्यातून होऊ लागला आहे. गावात अनेक ठिकाणी व प्रमुख चौकातील भागात गटारे गेल्या अनेक दिवसांपासून तुंबली आहेत.त्यामुळे इतरांना स्वच्छतेचे शहाणपण शिकवणार्या ग्रामपंचायत कार्यालय च्या दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. गावातली गल्लीतल्या रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.
घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधीमुळे दुर्गंधीमुळे लहान मुले वयोवृद्ध व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक मात्र त्रासून गेले आहेत.येथील लोकप्रतिनिधी या भागात फिरकत नाहीत. गावातील नागरी समस्या काय आहेत हे जाणून घेण्याची कधी तसदी घेत नाही. लोकप्रतिनिधींकडून विकासाची अपेक्षा नसल्यामुळे नागरिकांना तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न पडत आहे. ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे नाल्यांमध्ये पाणी तुंबत आहे.
साचलेल्या सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात सर्वत्र पसरते. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने गावात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नालीच्या घाण पाण्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून साथरोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा या समस्या ग्रामपंचायतने तात्काळ सोडवाव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहेली तिव्र आंदोलन छेडणार असल्याचे मनसेचे मनविसे तालुका उपाध्यक्ष अमोल राजपल्लु, शाखा प्रमुख प्रदिप मेश्राम, उपशाखा प्रमुख पवण जाधव, योगेश कस्तुरे, जयदिप चव्हाण, राजेश जाधव, प्रणय तीगडपल्ले, मधुकर आडे, अमोल जाधव, वंदनाबाई राठोड, पिरमलाबाई राठोड आदींनी निवेदना व्दारे कळविले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();