सह्याद्री चौफेर | न्यूज
केळापूर : मागील तीन चार दिवसापासून होणाऱ्या सतत पावसामुळे सायखेडा माध्यम प्रकल्पामधील पाण्याची पातळी आज दि. 12 जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता 96 टक्के भरलेले आहे. हवामान विभाग नागपूर यांचे अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टी होण्याचा ईशारा दिला आहे. तसेच आजदेखील सतत चा पाऊस सुरु असल्यामुळे कोणत्याही क्षणी सायखेडा माध्यम प्रकल्प 100 टक्के भरून ओव्हर फ्लो होऊन पाणी नदीत येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तालुक्यातील सर्व खुनी नदी काठच्या गावातील नागरिकांनी नदी काठी जाऊ नये, तसेच तालुक्यातील नागरिकांनी महत्वाचे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असल्यास नागरिकांनी त्या पुलावरून वाहतुक करू नये. याची दक्षता घ्यावी तसेच नैसर्गिक आपत्ती संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
■ नैसर्गिक आपत्ती विभाग कक्ष -
07232,240720
■ नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष केळापूर - 07235,227408
■ तहसीलदार केळापूर मो क्र -
7588424877
■ पोलीस निरीक्षक पांढरकवडा -
9518773302
■ मुख्याधिकारी नगरपालिका पांढरकवडा -
9422549776