टॉप बातम्या

नुकसानग्रस्ताना मोबदला द्या - गीत घोष

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : मागील तीन चार दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले असून शेतीची मोठ्या प्रामाणात हानी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असतांना आज दि.12 जुलै रोजी घोन्सा गावात पुराचे पाणी घुसून अनेक घरे पाण्यात आहे. वेकोलीच्या घोंसा ओपनकास्ट प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे शेकडो एकरावरील पिके पाण्याखाली आली असून घरात पाणी शिरले आहे. प्रशासन लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे परिसरात विदारक असे चित्र निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.

वेकोली च्या बेबंदशाही विरोधात गावाकऱ्याकडून जाहिर निषेध करित रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र, वेकोली प्रशासनाला तीळमात्र जाग आली नाही. सततच्या पावसाने घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. असाच महापूर 1989,90 ला झाला होता त्यात घरांची व शेतीचे मोठे नुकसान झाले होते. याची आठवण अनेकांनी बोलून दाखविली.

परिणामी वेकोली (WCl) प्रशासनावर कारवाई करण्याची, तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झाले आहे त्यांना मोबदला व नदीची पातळी खोल करुन त्यास रुंदी वाढवून संरक्षण भिंत बाधण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी,अ.भा.संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांनी केली आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();