कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मुकेश द्रोनाचार्य कडु (43) रा अशोक नगर, वणी असे अपघातात मृत पावलेल्याचे नाव आहे. मृतक हा भाटीया कोलवाशरीज येथे नौकरीवर होता. आज तो कोलवाशरी येथे कामावर गेले असता, रात्री 8 वाजता दरम्यान, तो दुचाकीने (MH 29 W 7429) परत येत असतांना लालपुलीया परिसरात अज्ञान वाहनाने त्याला धडक दिली.
परिसरातील काही नागरिकांनी त्याला वणी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.