चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : समाजसेवेत नेहमी अग्रेसर असलेल्या उमेश पोद्दार यांच नाव आवर्जून घेतलं जातं. नगर परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये शिकत असणाऱ्या चिमुकल्याचा पडून डोक्याला मुका मार लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी उघडीस आली होती.
सदर घटनेची माहिती मिळताच शहरातील गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून येणारे जनसेवक श्री उमेश पोद्दार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भोई पुरा वार्डातील पचारे कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना 11 हजार रुपयाची मदत केली.
यावेळी युवासेनेचे अजिंक्य शेंडे, पियुष चव्हाण, व मित्र परिवार उपस्थित होते.