टॉप बातम्या

पिंपळापूरात अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली

सह्याद्री चौफेर | न्यूज 

राळेगाव : तालुक्यात मागील सात ते आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले असून शेतातील पिकांना हानी होत आहे.सतत च्या संततधार पावसाने तालुक्यातील पिंपळापुर परिसरातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली. अशातच सौ विद्या भास्कर शेटे यांच्या शेतातील विहीर काल झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून शेकडो हेक्टर पाण्याखाली आल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. संबंधित विभागाने पिंपळापुर परिसरातील शेतीचा आढावा घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यात अशी मागणी शेतकरी राहुल शेटे यांनी माध्यमातून केली आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();