मारेगाव : तालुक्यात मागील पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले असून शेतातील पिकांना हानी होत आहे. सतत च्या पावसाने तालुक्यातील वनोजा परिसरातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली.
अशातच वर्धा नदीला डाब आल्याने गट 336 ते 365 मधील शेती पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतातील पिकांचे नुकसान मोठे झाले असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यानी सांगितले आहे.
तालुक्यात सतत संततधार पाऊस सुरु असून शेकडो हेक्टर पाण्याखाली आल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने वनोजा परिसरातील पुर परिस्थितीचा आढावा घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली असून
पुरामुळे लहुदास वनकर, नत्थू परचाके, दयाल मडावी, गुलाब खैरे, सुमन वेले, जगन देवाळकर, रामकिशन देवाळकर, गणपत महादेव राऊत, पांडुरंग देवाळकर, आनंदराव बरडे, संभा आत्राम, संजय झाडे, अनिल झाडे यांच्या सह अन्य शेतकऱ्यांचे शेत पाण्याखाली गेली असून शेतातील पूर्ण पिके नष्ट झाली आहे.