विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यातील बुरांडा ते खापरी रस्त्याच्या कामाला पंधरा वर्षानंतर सुरुवात झाली आणि 2.5 की.मी पैकी फक्त 2 कि.मी चे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उर्वरीत अर्धा कि.मी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
मौजा खापरी येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग असुन मुसळधार पाऊसामुळे सदर रस्तावर चिखल व साचलेल्या पाण्यामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. या रस्त्याने वाहन चालवीतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या रस्ता पंधरा वर्षांनंतर मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली मात्र, केवळ 2.5 पैकी 2 कि.मी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. मागील मे महिन्यात करण्यात आले. संथगतीमुळे उर्वरीत अर्धा किमीचा रस्ता पूर्णताहा रखडून खड्डे चाळण झालेली आहे.
तालुक्यामध्ये सध्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जनजीवन प्रभावित झाले शेतमालांचे नुकसान होत आहे. जागोजागी खड्डे दिसतात, या संदर्भात प्रशासन विचारपूस केली असता, सबंधित अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितले की, तुमचा रोड जिल्हा परीषद मधुन मंजुरी करिता पाठवला आहे. आणि आता सरकार बदल्यामुळे तो रद्ध करण्यात आला आहे. अशी धक्कादायक! माहिती देण्यात आली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच गावाच्या विकास कामाला खिळ बसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.