कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली असतांना मागील चार दिवसापासून तालुक्यात संततधार पावसाने थैमान घातल्याने शेतीची कामे ठप्प पडली आहेत.
टोबणं, पेरणी झाल्यापासून दमदार पावसाची आवश्यकता होती. मागील चार दिवसापासून सतत च्या मुसळधार पावसाने परिसरातील नदी नाले ओसंडून वाहू लागले. शेतकऱ्यांनी शेतात टोबणी पेरणी केली ती पिके आता चांगली बहरू लागली. परंतु वाढत्या कचऱ्यामुळे पिकांचे नुकसान होऊ लागले. तसेच अतिवृष्टीमुळे शेत जमिनीची सुपीकता कमी झाली.