कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मुंबई : आरएसएस प्रणित भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय संविधानाची पायमल्ली होत आहे, देशाच्या एकता व अखंडतेला हे कृत्य घातक आहे, पैकी शिक्षणावर जीएसटी अश्या देश विघातक कारवाया करणाऱ्या प्रधानमंत्री मोदींची अंत्ययात्रा काढू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सोसिएल मीडिया द्वारे दिला.
पॅन्थर डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतीय संविधानाची पायमल्ली करत सुटले असून फक्त जात व धन दांडग्यांच्या बाजूचे निर्णय घेऊन आर्थिक अस्मानतेत फार मोठी दरी निर्माण करत आहेत, श्रीमंत व्यक्ती श्रीमंत आणी गरीब रसातळाला पोहोचवण्याचे पक्षपाती राजकारण सध्या देशात चालवले आहे. या सर्व विघातक कारवायांचा विरोध होने अत्यंत गरजेचे आहे.
भारतीय संविधांनाच्या कलमानव्ये सर्वांना शिक्षण हे मोफत आहे, भारत सरकार स्वतः कर्तव्य विसरून देशाशी समाजाशी आणी बाल-तरुन व युवा भारताच्या भविष्याशी गद्दारी करत आहे. या सरकारने शिक्षणाचे पूर्ण बाजारीकरण केले आहे आहे. अश्या घडामोडीमुळे लवकरच भारतात श्रीलंकेसारखी परिस्तिथी येणार नाही अशी शक्यता नाकारता येणार नाही.
शिक्षण व अनधान्या वरील जीएसटी निर्णय परत नाही घेतल्यास अश्या जमीर मेलेल्या प्रधानमंत्र्याची राज्यातील सर्वात सक्षम इमारत म्हणजेच मंत्रालयासमोर पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या उपस्तीथीत प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून निषेध नोंदवू असा ईशाराही यावेळी पॅन्थर ऑफ
सम्यक योद्धा या समाजिक लढवय्या संघटने चे संस्थापक महासचिंब पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.