टॉप बातम्या

मारेगांव झरी जामणी, वणी तीनही तालुके ओला दुष्काळ जाहीर करा- राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : मागील १५ दिवसापासून अतिवृष्टीमुळे बेंबळा प्रकल्प, वर्धा धरण ओव्हर फ्लो झाल्याने वर्धा नदीच्या पात्रता पाणी सोडण्यात आले, त्या आलेल्या महापूरामुळे नदीलगतचे किमान तीनही तालुक्यात अतोनात नुकसान झाले. तरी तीनही तालुके "ओला दुष्काळ" जाहीर करून खरिपाचे पिक कर्ज माफ करावे. व रब्बीसाठी पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५०,००० रु. प्रोत्साहनपर जमा करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनातून करण्यात आली आहे. 

आदरणीय साहेब शेतकरी फार चिंतेत आहे. किमान १५००० हेक्टर च्या जवळपास जमीन पाण्याखाली गेली आहे. शेत मालांचे मोठे नुकसान झाले आहे. पिक पूर्णतः नष्ट झाले असून अजूनही नदीचे पाणी उतरले नाही. तरी आपण पुढाकार घेऊन तीनही तालुके ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांपर्यंत सर्व प्रकारची मदत पोहोचवावी. सतत पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. शेत शिवारातील साहित्य, खते पाण्यात विलीन झाली असून मुक्या जनावरांना अतिवृष्टी ची झळ बसली आहे. त्या मुक्या जनावरांना चारा सुद्धा उपलब्ध करून द्यावा. अशी आर्तहाक व मागणी आहे. 

निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष  सचिन पचारे, यांच्या सह दिलीप येडमे, अतुल पचारे व स्वप्नील चिंचूलकर आदींची उपस्थिती होती.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();