सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यामध्ये शहर महिला मोर्चा अध्यक्षपदी मंजुषा बोढाले यांची तर व्यापारी आघाडीच्या सरचिटणीसपदी प्रविण भट यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनाला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास तालुका महामंत्री प्रशांत नांदे, शहर अध्यक्ष अनूप महकूलकर, माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे तसेच जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा शोभाताई नक्षणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पक्षविस्तार आणि जनसंपर्क अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.