टॉप बातम्या

दोन बहीन भावाची पोलिस खात्यात निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : श्री जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव येथे वर्ग पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलेले दोन माजी विद्यार्थी व सख्खे बहीन भाऊ अमित राजेश दुर्गे व कु.आचल राजेश दुर्गे यांची नुकत्याच घेण्यात आलेल्या पोलिस भरती परीक्षेत अनुक्रमे नागपुर व वर्धा येथे निवड झाली.

हे दोनही बहीन भाऊ हे मारेगाव तालुक्यातील केगाव या छोट्याशा आदिवासी बहुल दुर्गम गावात राहणारे विद्यार्थी आहेत.त्यांचे पालक साधारण शेतकरी आहे परंतु मुलांनी मेहनतीच्या जोरावर पोलिस खात्यात यश संपादन केले आहे.ही बाब ग्रामीण भागातील शेतकरी पाल्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे.
       
या दुर्गे बंधू भगिनी ने मिळविलेल्या उज्ज्वल यशाबद्दल माजी विद्यार्थी म्हणून आज दिनांक २८ मार्च २०२६ रोज शनिवारला श्री.जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव येथे उभयतांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेश वाघमारे व जेष्ठ शिक्षक माधव कोहळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी अनिल पेचे,नरेंद्र खोके,पंकज राठोड,सतिश गौरकार,प्रशांत देरकर,कु.कलावती कुडमेथे,सागर कडू इत्यादी उपस्थित होते.*
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();