सह्याद्री चौफेर | सह्याद्री चौफेर
वणी : तालुक्यातील ग्रा.पठारपूर मधील गट ग्रामपंचायत पिल्की वाढोणा येथे सतत झालेल्या अतिवृष्टी मुळे चक्क गावातील प्रवेश रस्त्यावर मातीचे गाळ साचल्याने लोकांना जाणे येणे करणे अतिशय कठीण झाले आहेत. या रस्त्यावरून जात असताना गावातील शाळकरी मुले, शेतकरी, मजूर यांना या चिखलाचा सामना करावा लागत आहे. तर या रस्त्यानी शाळेत जात असतांना लहान मुलगा त्या चीखलामध्ये पडला व त्याच्या शाळेचा ड्रेस चिखलाने माखला व त्याला दुखापत झाली. या रस्त्याने जाणारे वाहन चालक बरेच वेळा घसरून पडल्याने कुठलाही अनैतिक प्रकार घडू शकते. या संदर्भात ग्रामपंचायत सचिव,सरपंच यांना वारंवार सुचना देऊन सुद्धा या बाबतीत स्थानिक प्रशासन काना डोळा करीत आहेत. या रस्त्यावर जणू काही 'आंबिलाच्या कळईत शिजतो पिल्की वाढोणा हे गाव' असे दृश्य आपल्याला पहायला मिळतात. तसेच पिल्की वाढोणा गावातील पाण्याचे बोअरवेल (हातपंप) एक महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. परंतु अद्यापही बोअरवेल पंप चालू करण्यात आलेला नाही. तरी याकडे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी काळजीपूर्वक लक्ष घालून रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावा आणि बोअरवेल हातपंप पूर्ववत करावे व गावातील या समस्यांचे निवारण करावे. असे जनतेची अपेक्षा आहे. गावातील समस्याचे हल करण्यासाठी गावातील नागरिक नितेश पत्रकार यांच्या कडे येत असतात, मी ग्रामसेवक यांना स्वतः फोन करतो,पण मात्र फोन उचलत नाही. त्यामुळे या बाबी कडे गटविकास अधिकारी साहेब वणी यांनी लक्ष देऊन ग्रामसेवक यांना आदेश देवून
तत्काळ बोअरवेल आणि त्या रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलामध्ये मुरून टाकण्यात यावा.