सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : मुसळधार पावसाने बेंबळा ओव्हर फ्लो झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, या दृष्टीने नदी पात्रात बेंबळाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी मारेगाव तालुक्यातील शिवणी धोबे, वनोजा गाडेगाव, चानोडा, पार्डी, दांडगाव, मुकटा, आपटी व चिंचमंडळ या गावांना सर्वाधिक पुराचा फटका बसला.
यात चिंचमंडळ येथील अतुल पचारे यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले, त्या मुळे त्यांच्या गोठ्यातील खतांच्या 180 बॅग पाण्यात विलीन झाल्या व गावरान पक्षी जवळपास 1 हजार असे पुरात वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले, ही बाब "सह्याद्री चौफेर" न्यूज मीडियाच्या माध्यमातून प्रशासन दरबारी पोहचली व मारेगाव तहसीलदार साहेब यांनी पीडित कुटुंबियांना भेट देवून पचारे कुटुंबियांना प्रशासन शासन आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास सक्षम असल्याचे, आधार देत पुढील पूर परिस्थितीकडे रवाना झाले. या अनुषंगाने तहसीलदार पुंडे साहेब व तलाठी, कर्मचारी यांचे पचारे परिवाराकडून सुखद आभार मानण्यात आले. या भेटी नंतर येथील युवा शेतकरी अतुल पचारे यांनी "सह्याद्री चौफेर" ला संपर्क साधून याबाबत माहिती दिली व सह्याद्री चे आभार मानले. असेच सर्व सामान्यांचा आवाज प्रशासन दरबारी पोहचवत रहा..! आणि आपले पुनःश्च खूप खूप आभार!