कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : सतत कोसळणाऱ्या पावसाने मारेगाव वणी तालुक्याची परिस्थिती हाताबाहेर गेली. या ठिकाणी बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाचवेळी नदीपत्रात आल्याने नाल्यांचे पाणी गावाशेजारीच थांबले आहे. यातून गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरा मुळे हजारो हेक्टरवरील पिके प्रभावित झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून यावर्षी मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यातील शिवणी धोबे या गावाच्या परिसरातील शेतामध्ये सोमवारी दुपारी वर्धा नदीचे पाणी शिरले. सायंकाळी हे पुराचे पाणी गावात शिरू लागल्याने नागरिकांची चांगलीच दणादाण उडाली. तालुका प्रशासनातील अधिकारी शिवणी येथे पोहचले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. वर्धा नदीच्या तिरावर असलेल्या गावांना क्षणोक्षणी या नदीचा बसत फटका बसत असतो.
तालुक्यात पुराचे थैमान असून शिवणी (धोबे) गावात पुराचे पाणी शिरले असून सेलू गावाला पुराचा वेढा पडला आहे. तसेच वनोजा देवी येथील शाळेत पाणी घुसले असून घरातही पुराचे पाणी शिरले आहे. या नदी काठावरील चिंचमंडळ, केगांव, गाडेगाव, चनोडा, शिवणी, पार्डी, दांडगाव, आपटी या गावातील शेतकऱ्यांना पुराचा धोका असतो. येथील शेतामध्ये पाणी शिरले असतांना यात शेतकऱ्यांना तात्काळ मदत व ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी जोर धरत आहे.
यावेळी नदीने चांगलेच उग्र रूप धारण केले आहे. हजारो हेक्टर पाण्याखाली गेली. पुराणे हाहाकार माजवला असून या नदीच्या पातळीत वाढ होत असून, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. वणी तालुक्यातील कवडशी, सावंगी, नवीन चिंचोली या वर्धा नदीचा फटका बसला आहे. त्यामुळे वणी मारेगाव तालुक्यातील कित्येक गावाचा संपर्क तुटला असून सखल वसत्या मध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे. गोठ्यात असलेले खत, पाण्यात विलीन झाली असून शेतीउपयोगी साहित्य पुरात गहाळ झाली.
बेंबळाचे 20 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग होऊन वणी मारेगाव तालुक्यातील नदी काठावरील गावं प्रभावित झाले. मुसळधार पावसाने बेंबळा प्रकल्पाच्या जलाशय पातळीत मोठी वाढ झाल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता धरणाचे सर्व दरवाजे 1.20 मिटरने उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी पाण्याचा येवा 2500 घनमीटर सेकंद एवढा होता. जाहिरात साठी संपर्क : 9011152179