टॉप बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; आरोपीवर गुन्हा दाखल

प्रतिनिधीक फोटो 

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणीलग्नाचे आश्वासन देत तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वणी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील 20 वर्षीय पीडित कुमारीकेने दिलेल्या फिर्यादीवरून संकेत जितेंद्र बुरांडे रा. ब्राम्हणी (वय 25) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 अन्वये अपराध क्रमांक 246/2026 नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून 15 ऑक्टोबर 2024 ते 24 मार्च 2026 या कालावधीत वणी येथील एका हॉटेलमध्ये सात ते आठ वेळा शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, 24 मार्च 2026 रोजी फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याने हा प्रकार समोर आला.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौधरी (वणी पोलीस स्टेशन) करीत आहेत.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();