टॉप बातम्या

वणी आगारात स्वच्छतेची कसोटी; ‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान’चे चौथे सर्वेक्षण यशस्वी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणीवणी आगारात ‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान’ अंतर्गत चौथे स्वच्छता सर्वेक्षण २७ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडले. या सर्वेक्षणादरम्यान आगार परिसरातील स्वच्छता, प्रवासी सुविधा आणि एकूण व्यवस्थापनाची सखोल तपासणी करण्यात आली.

नांदेड विभागाचे नियंत्रक तसेच यंत्र अभियंता अभिजीत कोरटकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध बाबींचा आढावा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या निकषांची बारकाईने पाहणी करण्यात आली. यादरम्यान बसस्थानक प्रमुख लता मुळेवार, प्रभाकर कोरेवार, पत्रकार राजू धावंजेवार आणि प्रवासी मित्र परशुराम पोटे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आगार प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या सर्वेक्षणामुळे स्वच्छता उपक्रमाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();