टॉप बातम्या

ट्रॅक्टर चालकांवर उपासमारीची वेळ; रेती बंदमुळे रोजगार ठप्प

AI

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतीची कामे जवळपास थांबली असून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरधारक व चालकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.

ग्रामीण भागात बहुतांश ट्रॅक्टरधारक व चालक हे शेतीसह घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या रेती वाहतुकीवर अवलंबून असतात. गेल्या काही महिन्यांत घरकुल लाभार्थ्यांना रेती पुरवठा सुरू असल्याने चालकांना थोडाफार रोजगार मिळत होता. मात्र, अलीकडे रेती वितरणासाठी ऑनलाइन प्रक्रियेची अट लागू झाल्यानंतर हा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
यामुळे ट्रॅक्टरधारक व चालक सध्या ‘थंड बस्त्यात’ गेले असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. “रेती सुरू असती तर कशीबशी हाताला काम मिळत होते, आता तेही बंद झाल्याने अडचणीत भर पडली आहे,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, उन्हाळ्यात शेतीची कामे नसल्याने घरकुलाशी संबंधित कामांना गती मिळाल्यास रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रेती पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणीही ट्रॅक्टर चालकांकडून करण्यात येत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();