चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : शहराच्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सावर्ला जवळ एका उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ला वणी कडे येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. ही घटना आज 15 जून रोजी नुकतीच घडली.
प्राप्त माहिती नुसार नागपूर हायवे वरील सावर्ला च्या अलीकडे ट्रॅक्टर उभे होते, अशातच वणीकडे येणाऱ्या ट्रकने उभ्या ट्रॅक्टर ला जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टर चा चकणाचूर झाला आहे. सुदैवाने ट्रॅक्टर वर कोणी नव्हते, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती वणी पोलिसांनी मिळताच घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा सुरु असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी विटा चा सडा पडून दिसत असल्याने सदर ट्रॅक्टर विटाचे वाहतूक करित असल्याचे कयास आहे.
उभ्या ट्रॅक्टरला वणीकडे येणाऱ्या ट्रकने दिली धडक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 15, 2022
Rating:
