मारेगाव : अवैध मटका बंद करा; छावा क्षात्रविर सेना धडकली पोलिस स्टेशनला

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : शहरात गेल्या अनेक दिवसापासुन अवैधरित्या वरली सट्टा मटका पट्टी चालू असून, पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करित आहे. या सर्व बाबीकडे आपण लक्ष देवुन होत असलेल्या अवैधरित्या मटका पट्टी च्या अड्यावर कडक कार्यवाही करावी. जेणेकरून होत असलेल्या गोर गरिब लोकांची फसवणूक, लुटमार थांबेल. छावा क्षात्रविर सेना शाखा मारेगांव च्या वतीने पोलीस निरीक्षक पुरी यांना निवेदन देण्यात आले आहे.
तत्काळ बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. अन्यथा छावा क्षात्रविर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशा ईशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे. छावा क्षात्रविर सेने चे संस्थापक अध्यक्ष समाधान सूरवसे, प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी, संगीता ताई डाहुले, विशाखा ताई राजूरकर, महीला विदर्भ संपर्क प्रमुख ऍड.प्रा वंदनाताई जाधव यांच्या मार्गद्शनाखाली व विदर्भ प्रमुख श्री विलास बुरान, महीला विदर्भ अध्यक्ष प्रतिभाताई तातेड, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष राजू जूनगरी, जिल्हा उपाध्यक्ष अजय धांडे, महीला तालुका अध्यक्ष मंजुषाताई पेंदोर, तालुका अध्यक्ष अनंता घोटेकर, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज घोटेकर, तालुका अध्यक्ष अभिषेक उपरे, तालुका उपाध्यक्ष संकेत लांबट, तालुका संघटक अजय लांबट, व छावा क्षात्रविर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मारेगाव : अवैध मटका बंद करा; छावा क्षात्रविर सेना धडकली पोलिस स्टेशनला मारेगाव : अवैध मटका बंद करा; छावा क्षात्रविर सेना धडकली पोलिस स्टेशनला Reviewed by सह्याद्री चौफेर on June 15, 2022 Rating: 5
Powered by Blogger.