नेत्रदान चळवळ व्यापक करावी - डॉ. रामप्रसाद लखोटिया

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : समाजातील अंधमुल, मुलींना दृष्टी प्राप्त व्हावी त्यांना ही निसर्ग पहाता यावा या समाजातील अंधाचे जिवन प्रकाशमय करण्यासाठी नेत्रदान उपक्रम ही चळवळीचे व्हावी. एका व्यक्ती आपल्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे. नेत्रदान हेच श्रेष्ठदान असल्याचे मत उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररंग्नालय उदगीर चे अध्यक्ष डाॅ रामप्रसाद लखोटीया यांनी जागतिक दृष्टी दिन निमित्ताने आयोजित महिला बचत गट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर उपस्थित 
श्रीकांत श्रीमंगले तालुका अभियान व्यवस्थापक, संतोष भुताळे, धनाजी भोसले, सारासारचे अध्यक्ष योगेश चिद्रेवार, गणेश मुंडे, रवी जवळे, जावेद शेख आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार तालुका अभियान व्यवस्थापक यांच्या वतिने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना नेत्रदान म्हणजे मनुष्य मृत्यू पावल्या नंतर त्याचे डोळे अंध व्यक्तीला दान करता येते. व समाजातील अंध मुल मुलीना नेत्रदानाचा नक्की फायदा होतो.
नेत्रदान करण्यासाठी नोंदणी करावी नेत्रदान लहान मुलापासून वृध्दांपर्यंत कोणीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती, ज्यांना चष्मा आहे, रक्तदाब,मधुमेह, दमा आदी विकार असलेले
नागरीकही नेत्रदान करू शकतात. तर 
एड्स, ब्लड कॅन्सर असे आजार असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. त्यामुळे आपण मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला उपस्थित राहीले आहेत त्यामुळे आपण नेत्रदान नोंदणी आवश्य करावे असे अव्हाण ही त्यांनी केले.
त्यामुळे मृत व्यक्तीचे नेत्रदान करावयाचे असल्यास लवकरात लवकर आरोग्य विभाग किंवा नेत्रपेढीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यांच्या अव्हानाला प्रतिसाद देत उपस्थित कार्यक्रमात तब्बल ३५ महिलांनी (नेत्रसखी) नेत्रदानाचा संकल्प केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत श्रीमंगले यांनी केले तर आभार धनाजी भोसले यांनी मानले.
नेत्रदान चळवळ व्यापक करावी - डॉ. रामप्रसाद लखोटिया नेत्रदान चळवळ व्यापक करावी - डॉ. रामप्रसाद लखोटिया Reviewed by सह्याद्री चौफेर on June 15, 2022 Rating: 5
Powered by Blogger.