चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची हलाकीची परिस्थिती असल्याने दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे जिल्हाधिकारी यांनी लेखी आदेश दिले असुन, त्या आदेशाची अंमलबजावणी करुन दारव्हा तालुक्यातील ८७ शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे उपलब्धकरुन पुनर्वसन अधिकारी बिबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बि-बियाने वाटप करण्यात आले.
बि-बियाने गरजू शेतकऱ्यांना वाटप करताना उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच दारव्हा प्रभारी तहसीलदार संजय जाधव, निरक्षक अधिकारी शिरीष कपडे मंडळ अधिकारी रविंद्र पंधरे, अनिल घोडेदीपक मनावर,तलाठी पुसनाके, कोत्तावर, वाघमोडे,तसेच सर्व मंडळ अधिकारी, तलाठी या कार्यक्रमास उपस्थिती होते.
दारव्हा तालुक्यातील ८७ शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 15, 2022
Rating:
